बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सुरज चव्हाण. सुरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला Suraj chavan Big boss 2024:सुरज चव्हाण बिग बॉस:Guligat:sqrqzq,असे डायलॉग बोलून तो सोशल मीडियामध्ये खूप फेमस झाला.
दोन महिन्यांखाली बीग बॉस मराठी या शोला सुरुवात झाली.Suraj chavan Big boss 2024 माझ्यासारख्या अनेकांसाठी हे नेहमीसारखी दुर्लक्ष करण्यासारखी बातमी होती.कारण बीग बॉस काय, कुठलेच रिॲलीटी शो आता पाहवत नाहीत.अमिताभ बच्चन यांचा KBC ही आता पाहावा वाटत नाही.कारण ओढून ताणून, विनाकारण इमोशनल अत्याचार करतात आजकाल. असो.तर बीग बॉस मी एक किंवा दोन आठवडे होऊन गेले तेव्हा पाहायला सुरू केलं.कारण होतं याचं करण्यात आलेलं मार्केटिंग.जिकडे पाहावं तिकडे फक्त बीग बॉस दिसत होतं.यात कलर्स मराठी तर होतंच पण रितेश देशमुख यांच्या टीमचा मोठा हात होता.प्रचंड पैसा खर्च करण्यात आला.सहज पाहायला सुरुवात केली.त्यात एक दोन चेहरे अत्यंत जवळचे वाटले.मग काय तुमच्या-आमच्या सारख्यांनी या शो ला TRP च्या शिखरावर नेऊन बसवलं.
किस्मत बडी कुत्ती चीज है.. साला कभी भी पलटी मार देती है! हॅपी न्यू इयर चित्रपटातला हा डायलॉगSuraj chavan Big boss 2024:सुरज चव्हाण बिग बॉस:Guligat:sqrqzq लागू पडतो. कालपर्यंत लोकांच्या टीकेचा धनी बनलेला सुरज, आज लोकांच्या काळजात घर करतोय. गुलीगत धोका आणि बुक्कीत टेंगूळ. या डायलॉगने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय. सुरूवातीला ज्यांनी सुरजची टींगल टवाळी केली. आज तेच सुरजच तोंडभरून कौतूक करत आहेत.
बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सुरज चव्हाण. सुरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला. लहापणीच सुरजला त्याचे आई वडिल सोडून गेले. सुरजचे वडील वारले. त्यावेळी सुरज त्याच्या मित्रांसोबत अंगणात गोट्या खेळत होता. वडिल आपल्याला कायमचे सोडून गेलेत याची समज नसलेल्या वयातच सुरज पोरका झाला होता. आई-वडिलांचं छत्र हरपलं म्हणून सुरजला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. आठवीत सुरजने शाळा सोडली. आणि पोटापाण्यासाठी मोलमजुरी सुरु केली. काबाड कष्ट करुन सुरज स्वत: चं पोट भरत होता. कधीकधी तर त्याला उपाशीतापाशीच झोपावं लागलं.
जर टीक टॉक सुरजच्या आयुष्यात आलं नसतं तर, कदाचित सुरज मजूर म्हणूनच जगला असता. पण, टीकटॉकच्या रुपाने आलेली संधी सुरजने अचूक हेरली. एके दिवशी सुरजच्या भाच्याने त्याला टीक-टॉक बद्दल माहिती दिली. सुरजेही आवड म्हणून त्यावर एक व्हिडीओ बनवला. जो तुफान व्हायरल झाला.
यानंतर सुरजने मागे वळून कधीच पाहिलं नाही. मोल मजुरी करताना छंद म्हणून सुरु केलेले रिल्स आता सुरजला प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देत होते. Suraj chavhan Big boss 2024:सुरज चव्हाण बिग बॉस:Guligat:sqrqzqसुरजची वेगळी भाषा, बोलण्याची अजब स्टाईल, अगळ्या-वेगळ्या शब्दातले डायलॉग लोक आवडीने शेअर करु लागले. लोक सुरजला ओळखू लागली. टीक टॉक नंतर सुरज इंन्स्टाग्राम आणि युट्यूबवरही तितकाच गाजला.
Suraj chavan Big boss 2024सुरज लोकप्रिय झाला होता. पण, तरीही त्याचा स्वभाव तसा साधाभोळाच. सुरजच्या या स्वभावाचा अनेकांनी फायदा उचलला. कार्यक्रमाला सेलिब्रिटी म्हणून बोलावलेल्या सुरजला अनेकांनी फसवलं. कुणी त्याला ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे दिलेत, तर कुणी कपड्यांच्या दुकानात उद्घाटनाला बोलवलं. आणि फक्त शर्ट पॅन्ट देऊन घरी पाठवलं!पण,Suraj chavan Big boss 2024:सुरज चव्हाण बिग बॉस:Guligat:sqrqzq हार मानली नाही. त्याने वाईट पाऊल उचललं नाही. तो न खचता आपलं काम करत गेला. सुरूवातीच्या काळात सुरजच्या ज्या डायलॉगवरुन त्याची खिल्ली उडवली गेली. हळू हळू तेच डायलॉग लोकप्रिय होते गेले. सुरजवर मिम्स बनू लागले. अनेकांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सुरजला रोस्टही केलं. काहींनी त्याला कॉपी करण्याचाही प्रयत्न केला. पण, सुरज शांतपणे त्याचं काम करत राहीला.आज बिग बॉस सारख्या नामांकीत रिअॅलटी शोचा तो प्रबळ दावेदार म्हणून तो आला आहे. कधी काळी साधं शर्ट पॅन्ट देऊन घरी पाठवणाऱ्या सुरजला. आज उद्घाटक म्हणून बोलवायला ५० ते ६० हजार मोजावे लागतात. इंन्टाग्राम आणि युट्यूब रिल्सच्या माध्यमातून सुरज महिन्याला लाखो रुपये कमावतो. सुरजला आज अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला सुरजला ज्या नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.. तेच नेटकरी आज सुरजच्या साधेपणावर फिदा झालेत.. ते आज सुरजच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कालपर्यंत ज्या सुरज डायलॉग डोक्यात सनक आणायचे. आज त्याच डायलॉग मधला भाषेचा गोडवा अनेकांना भावतो आहे.
Suraj chavan Big boss 2024:सुरज चव्हाण बिग बॉस:Guligat:sqrqzqअनेकांना त्याची विनम्रता, निरागसता आवडली. आणि ती आवडण्याजोगीच आहे. ग्रामीण भागात राहून काहीतरी करू पाहणाऱ्या लाखो तरुणांचं सूरज प्रतिनिधित्व करतो. ज्यांना काहीतरी करायचं आहे. पण आपली भाषा, राहणीमान, शिक्षण आणि पैशाबद्दल न्यूनगंड आहे. त्या सगळ्यांसाठी सुरज आदर्श आहे. माझ्यासाठी सुद्धा❤️
visit my website https://missionglobaljb.com
Suraj chavan Big boss 2024
नाव | सुरज चव्हाण |
वडिलांचे नाव | दत्तू चव्हाण |
आजोबाच्या नाव | नारायण चव्हाण |
बहिणी | सात |
आई वडील | कैलासवासी झालेले आहेत |
शिक्षण | आठवी पास |
Who is Suraj Chavan?
बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सुरज चव्हाण. सुरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला Suraj chavan Big boss 2024:सुरज चव्हाण बिग बॉस:Guligat:sqrqzq,असे डायलॉग बोलून तो सोशल मीडियामध्ये खूप फेमस झाला,बिग बॉसमुळे सुरजला अजून एक मिळाली मोठी ऑफर….मराठी बिग बॉसमुळे सुरजचं नशीब फळफळलं आहे. सूरज चव्हाण सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच मात्र बिग बॉसमुळे त्याला आता स्टार बनता आलं आहे.
Suraj chavan educations ?
- सुरज चव्हाण यांचा जन्म बारामती येथील मोडवे गाव येथे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत झाला आहे
- त्याचे जेमतेम शिक्षण आठवी पास हे आश्रम शाळेत झाले आहे
- सुरज ला आठवी पास असूनही लिहायला वाचायला येत नाही
Suraj Chavan’s guardianship accepts the Pandharinath kamble.
Suraj chavan Big boss 2024 पॅडी बिग बॉसच्या घराबाहेर पण सुरज भावुक का नाही झाला?… काल रविवारी मराठी बिग बॉसच्या घरातून पॅडी कांबळे यांची एक्झिट झाली. आपणच घरातून बाहेर जाणार म्हणून पॅडीने नाव घोषित करण्याअगोदर स्वतःचे नाव घेतले होते. पण इतके दिवस सुरजला त्यांनी सांभाळून घेतले त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या जाण्याचे थोडेसे वाईट वाटले आहे. सुरजने पॅडीला निरोप देताना गळाभेट घेतली. पण तो भावुक झाला नाही म्हणून प्रेक्षकांना प्रश्न पडले आहेत. सूरजला माहीत आहे ब8ग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंत सगळे आपापल्या कामाला लागतील. हे सगळे फक्त घरापूरते मर्यादित आहेत. त्याला भावुक व्हावं अशी समज नाही ,नाहीतर इतके दिवस पॅडीने सांभाळून घेऊनही सूरजने त्यांना पाय दाबायला लावले होते. काय चूक काय बरोबर याची समज सुरजला अजूनही नाही. त्याचमुळे त्याच्या अशा वागण्यावर प्रेक्षक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सूरज साधा मुलगा आहे त्याला दुनियादारी माहीत नाही हेच अंतिम सत्य मानून त्याचे लाखो चाहते त्याला सपोर्ट करत आहेत. त्यामुळे पॅडीजाण्याने तो का रडला नाही हा एक निरर्थक प्रश्न म्हणावा लागेल
Suraj Chavan’s final game in big boss family.
Suraj chavan Big boss 2024माझं बीग बॉस पाहण्याचं मुख्य कारण होतं सुरज चव्हाण.मग पाहताना पॅडी भाऊ दिसले, अंकिता दिसली, डीपी दिसला, असं करत करत हे आपल्या घरातले सदस्य वाटायला लागले.हे चार पाच लोक मुख्य कारण होते बीग बॉस पाहण्याचे.नंतर पाहताना निक्की तांबोळीने लक्ष वेधून घेतलं.कारण कॅमेरा अर्धाअधिक वेळ तिच्यावरच असायचा.नंतर समजलं ही हिंदी सिजन खेळून आलेली आहे.लगेच लक्षात आलं की ही बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती आहे.कारण असं एक कॅरेक्टर असल्याशिवाय शोमध्ये मजा नसते.हेच असतात जे कंटेंट देतात आणि तुमच्या आवडत्या सदस्यांचे पेशंस चेक करतात.
Suraj chavan Big boss 2024निक्कीने तिचा रोल सांभाळत भरपूर कंटेंट दिला. शेवटी कंटेंट क्वीन ठरली.मध्ये संग्राम चौगुले येऊन गेले.त्यांनी चुकून कॉन्ट्रॅक्ट शब्द काढला आणि बीग बॉसनेही ते सेंसर न करता दाखवलं.तर हाच तो कॉन्ट्रॅक्ट असतो, ज्याने निक्की टॉप ३ पर्यंत पोहोचली.तसं पाहिलं तर ती पहिल्यावेळी डेंजर झोनमध्ये होती तेव्हाच बाहेर गेली असती.कारण ती कितीही कंटेंट देत असली तरीही महाराष्ट्राला तरी निदान अशी माणसं आवडत नाहीत.तिचा स्वभाव आणि ती दोन्ही इरिटेटींग होते.पण तोतिचा तो रोल होता म्हणून तिला दोष देता येणार नाही.काही ठिकाणी तिची खरी बाजूही दिसली.त्यात ती अत्यंत चाणाक्ष आहे हे लक्षात आलं.तसंच ती मनाने फार खंबीर भासली.तिला समोरच्याची सायकॉलॉजी ओळखता येते.तिने त्याचा अभ्यासही केलाय.असो.निक्कीने मनोरंजन केलं हे जरी खरं असलं तरीही बाहेर आल्यावर तिचे हाल होणार आहेत!
सुरज बद्दल बोलू.मी तरी त्याचे Video पाहून नाक मुरडायचो.असे माझ्यासारखे अनेक होते.पण जेव्हा त्याची कहाणी ऐकली तेव्हा अचानक त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटायला लागला.आणि तो सांगत होता ते फेकही नव्हतं.तो घरात मन लावून झाडत असतानाचा Video वायरल झाला आणि डोळ्यात पाणी आलं.Suraj chavan Big boss 2024कारण काम हेच त्याचं आयुष्य आहे.बाहेर त्याला कामाशिवाय भाकरीचा तुकडाही मिळत नाही.काम हेच त्याचं करिअर, काम हेच त्याचं जीवन!!
हे एक मोठं कारण होतं महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घ्यायचं.दुसरं एक कारण म्हणजे तो डोक्याने थोडा संथ आहे.हे त्यालाही मान्य आहे.पण बीग बॉसच्या घरात हीच गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली.कारण माणसाचं या घरात जास्त डोकं चालत असेल तेव्हा इथे तो हमखास चूका करतो.बाहेर दिसताना ते अत्यंत वाईट दिसतं.पण सुरजला अर्ध्याअधिक गोष्टी समजल्याच नाहीत, त्यामुळे त्याने चूक करायचा प्रश्नच नव्हता.
Suraj chavan Big boss 2024आणखी एक गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली, ती म्हणजे त्याला जगातलं जेवढं समजलं पाहिजे ते बरोबर समजतं.कदाचित देवाने बाकी सगळं हिरावून घेतल्यामुळे ही त्याला दिलेली देण असावी.हे जग अत्यंत वाईट आहे पण त्याला फक्त चांगल्याच गोष्टी समजतात त्यामुळे तो घरात वागायचं त्यावेळी चांगलंच वागला.महाराष्ट्राला जवळचा भासायला लागला.त्याचा भोळेपणा आपल्याला भावला.तो समोरच्याला आदराने बोलत राहिला.ह्रदय जिंकत राहिला.वेळप्रसंगी अरबाज आणि वैभवसारख्या पहिलवानांनाही आपला गावठी हिसका दाखवून हिरो बनला.Suraj chavan Big boss 2024अभिजीत बोलल्याप्रमाणे सुरज बागडत बागडत फायनलला आला.शेवटी ट्रॉफी जिंकून गेला.ट्रॉफी जिंकण्याचा त्याचा जो निर्धार होता तोही महत्त्वाचा होता.पावर ऑफ पॉझिटीव्ह, मॅनिफेस्टेशन, द सिक्रेट या संकल्पना ज्यांना माहीत आहेत, त्यांना हे योग्यरित्या समजेल.सुरज कडून तो निर्धार आणि ती सकारात्मकता शिकण्यासारखी आहे!तर आणखी एक विषय…..वैभव घराबाहेर पडला तेव्हा समजलं की हा तर चांगला माणूस आहे.त्याच्या चांगल्या गोष्टी बीग बॉसने दाखवल्याच नाहीत.डीपीसोबतही तेच झालं.वैभवनेहीसुरजला घरात भरपूर साथ दिलेली आहे.तोही गरीबीतूनच आलेला आहे.पण इथे त्याच्यावर अन्याय झाला.तो काही ठिकाणी चुकलाही.पण अरबाज निक्कीच्या फालतू लव स्टोरीपायी बीग बॉसने आठवडाभर दुसरं काही दाखवलंच नाही.तो सगळ्यात बंडल आठवडा होता.नाहीतर वैभव टॉप ५ चा नक्कीच दावेदार होता!
परत सुरज कडे येऊ…..त्याचं घर कच्चं आहे.तो आत्याकडे राहतो.त्याने रिल्समधून पैसे कमावले.पण त्याच्या हातात ते कधी पडलेच नाहीत.तो रील्स करतो म्हणजे खूप भारी कंटेंट देतो असं नाही.काही रील्स तर अत्यंत टूकार आहेत.हेच आता त्याला बदलावं लागणार आहे.त्याच्यावर आता मोठी जबाबदारी आहे.घरातSuraj chavan Big boss 2024 वडीलधाऱ्यांची भूमिका निभावणारे पॅडी दादा आणि अंकिता कदाचित त्याला हे समजावून सांगतीलही.महाराष्ट्राने त्याच्या गरीबीमुळे त्याला ट्रॉफी मिळवून दिली, हे जरी खरं असलं तरीही तो अत्यंत सुंदर खेळला.काही ठिकाणी त्याला गोष्टी अजिबात समजत नव्हत्या मान्य आहे पण ज्या समजल्या तिथे त्याने त्याची छाप पाडली.
Suraj chavan Big boss 2024आता त्याचं पक्कं घर होईल.तो घराला ‘बीग बॉस’ असं नाव देईल.आयुष्याला कलाटणी मिळेल पण हे टिकवणं खूप अवघड काम आहे.महिना दोन महिना तर त्याचं जगणंच मुश्किल होऊन बसेल कारण त्याचे फॅन्स अतिशय डेंजर आहेत.होय अनेक छपरीही आहेत.त्याला भरपूर त्रासून सोडतील.घरी जाणही अवघड होऊन बसेल.हे सगळं तो कसं सांभाळतो हा विचार करून काळजी वाटते.अंकिता, अभिजित, पॅडी, डीपी, जान्हवी, अरबाज, वैभव, वर्षा, आर्या, संग्राम, पुढारी हेदेखील छान खेळले.अनेक जागी चुकले.म्हणूनच लवकर बाहेर पडले.बाकीही मस्त खेळले पण लवकर बाहेर पडले.
पण हा थोडा स्क्रिप्टेड, थोडा खरा असणारा बीग बॉस अनेकांना भावला.शेवटी शेवटी माती खाल्ली पण करमणूक नक्कीच केली.Suraj chavan Big boss 2024रितेश भाऊंनी हळूहळू का होईना पण मस्त पकड घेतली होती.छान होस्टिंग केली.पण शेवटचे दोन आठवडे सगळा शोच गंडला होता.कारणं अनेक असतील.कदाचित ती कारणं बाहेर येतील किंवा येणारही नाहीत.पण हा बीग बॉसचा सिजन कायम लक्षात राहील.पुढचा सिजन किंवा आता आलेला हिंदी सिजन कदाचित अनेक लोक पाहणारही नाहीत.मी तरी नक्कीच नाही पाहणार.अशा गोष्टी अचानक घडत असतात.बीग बॉसला कदाचित आशीर्वाद लाभला असावा. वरदान लाभलं असावं.अनपेक्षितपणे सगळं जुळून आलं आणि इतिहास घडला!टीमची मेहनत होती हेही नाकारता येणार नाही!!
सुरज परत एकदा शुभेच्छा!फक्त हे फेम तू नीट हाताळावं एवढीच एक अपेक्षा!बाकी शिवशंभो आणि मरीआई तुझ्या पाठीशी सदैव असतीलच!
आणखी एक गोष्ट सांगायची राहिली.Suraj chavan Big boss 2024
सूरज चव्हाण विजयी होऊ नये किंवा तो ट्रॉफी डिजर्व करत नाही असा सूर अनेकांनी लावला होता.त्याप्रमाणे त्याला बाहेर काढण्याचा डावही आखण्यात येत होता पण महाराष्ट्राचं इतकं प्रेम मिळत होतं की असा निर्णय बीग बॉस टीमला घेणं जड गेलं.शेवटी काही का असेना टीमने योग्य निर्णय घेतला!
बीग बॉसच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! Colors Marathi
पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन,Suraj chavan Big boss 2024.
Sq Rq Zq बुक्कीत टेंगूळ!!!!!
Who is Suraj Chavan?
सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठी 5 चा विजेता आहे.
How much money did Suraj Chauhan get from Bigg Boss Marathi 5?
सुरज चव्हाण ला बिग बॉस मराठी 5 कडून जवळपास 25 लाखाच्या अमाऊंट भेटली त्याच्या व्यतिरिक्त शॉपिंग व्हाउचर आणि इलेक्ट्रिकल वेहिकल सुद्धा भेटली.